Wednesday, May 19, 2021
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस द्वारा आयोजित सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन लातूर येथे दिनांक 17 18 फेब्रुवारी 2020 गिरवलकर सभागृह बार्शी रोड लातूर येथे हे संपन्न झाले. या साहित्य संमेलनास उपस्थित राहणार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 17 व 18 फेब्रुवारी 2020 रोजी ची विशेष कर्तव्य रजा मंजूर करण्यात आली होती .सदर साहित्य संमेलनासाठी माननीय शिवराज पाटील चाकूरकर माजी सभापती लोकसभा यांच्या शुभहस्ते थोर साहित्यिक श्री इंद्रजीत भालेराव राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अमित भैया विलासराव देशमुख, शालेय शिक्षण मंत्री महिला, व बालकल्याण मंत्री राज्यमंत्री ,पाणी पुरवठा राज्यमंत्री माननीय आमदार धीरज भैया विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले .सदर साहित्य संमेलनास अनेक मान्यवर नेते, थोर कवी साहित्यिक हजर होते. महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस द्वारा आयोजित सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन यामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून दोन शिक्षकांना स्वर्गीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले आहे ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यातून 1)श्री शंकरराव सखाराम बोरकर प्रभारी मुख्याध्यापक *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी तिखे तालुका रिसोड जिल्हा वाशिम* यांच्या शाल श्रीफळ व मानचिन्ह तथा गौरव पत्र देऊन गौरव करण्यात आला 2) श्री संजय सूर्यभान सुरेकर प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही घोडमोड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. *स्व. विलासराव देशमुख ज्ञान रत्न पुरस्कार 2020 देऊन गौरव करण्यात आला.*
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
उपयोगी शालेय अभिलेखे शिक्षकांसंबंधी अभिलेखे शिक्षक हजेरी रजिस्टर पाठ टाचण वही, शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर शिक्षक रजेचे...
-
-
Online Test-3 विषय:-इतिहास नाग.शास्त्र
No comments:
Post a Comment